Download App

राज्यभर मुसळधार : ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला रेड अलर्ट!

  • Written By: Last Updated:

Maharashtra Rain Alert : गेलया काही तासांपासून मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती उद्भवली असून मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, रायगडसह राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान विभागाने काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा आभाळ फुटल्याची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

21 जुलै रोजी हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.

तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, नंदूरबार, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला गेला आहे. सध्याच्या पावसामुळे रत्नगिरी जिल्ह्याला पावसाचा चांगलाचा तडाखा बसला आहे. चिपळूण आणि खेडमध्ये 48 तासांत तब्बल 327 मिलीमीटर पाऊस झाला आहे. उत्तर रत्नागिरीत भागात पावसाचा तडाखा जास्त आहे. पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. 19 जुलै पर्यंत राज्यात 58 टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील धरणसाठा आता 37 टक्क्यांवर गेला आहे.

Tags

follow us