Download App

सावधान! आज मुसळधार; ‘या’ 5 जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain :  राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत आहे. विश्रांती घेतलेला पाऊस लवकरच सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने आज राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राजधानी मुंबई (Mumbai) शहरात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली आहे. ढगाळ हवामान असले तरी पाऊस काही होत नाही. पाऊस नसल्याने खरीप हंगामही संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत पावसाची वाट पाहत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते.

गुडन्यूज! दोन दिवसांत बरसणार ‘पाऊस’धारा; ‘या’ भागाला मिळाला अलर्ट

18 ते 24 ऑगस्ट दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोर धरील, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सुरुवातील हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. त्यानंतर मात्र बदलत्या हवामानानुसार ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. येत्या 25 ऑगस्टपर्यंत राज्याच्या विविध भागात पाऊस पूर्णपणे सक्रिय होईल, असे हवामान विभागाने सांगितले.

नगरमध्ये बिबट्याचा संचार; जेरबंद करण्यासाठी वन विभागाची करडी नजर

35 लाख हेक्टरवरील पिके संकटात

मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने 35 लाख हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहेत. अत्यल्प पावसामुळे खरिपाची उत्पादन क्षमता सरासरी 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. पुढील आठ दिवसात चांगला पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us