अहमदनगर शहरात दिसलेला बिबट्या लवकरच जेरबंद होणार आहे. कारण बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून रात्रीचीही गस्त सुरु आहे. ज्या ठिकाणी बिबट्याने दर्शन दिलं त्याचं ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांनी दिली आहे.
‘हा भ्रष्टाचार नाहीतर शिष्टाचार आहे का?’; कॅगच्या अहवालावर विजय वडेट्टीवारांचा सवाल
राठाेड म्हणाले, बिबट्या साधारणतः १५ ते १६ किलाेमीटर अंतरावर फिरू शकताे. दाेन्ही ठिकाणी आढळलेला बिबट्या एकच किंवा दुसराही असू शकताे. त्यामुळे बिबट्या आढळल्याच्या ठिकाणी वनविभागाच्या पथकामार्फत निगराणी ठेवली जात आहे. सावेडी व साेनेवाडी परिसरात नागरिकांना दक्ष राहण्यासाठी जनजागृती केली जात आहे. गस्तीवर असणाऱ्या पथकाला त्या ठिकाणी बिबट्या आढळून आला, तर तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले जाणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं आहे.
धक्कादायक! मनपा आरोग्य अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरवर बिबट्याचा हल्ला, नगरमध्ये खळबळ
सावेडी उपनगर भागात एका नागरिकाला हा बिबट्या दिसल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालीयं. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. शहरातील बालिकाश्रम राेड, पंपिंग स्टेशन , बाेल्हेगाव परिसरात एक बिबट्याचा वावर आढळून आला.
भाजपला संविधान बदलायचंय; ‘त्या’ लेखाच्या आधारे पटोलेंचा गंभीर आरोप
हा बिबट्या पूर्णा हाॅटेलसमाेरील ऊसातून बाहेर आला होता. त्यानंतर सीना नदीच्या दिशेने बाेल्हेगावकडे गेल्याचे निदर्शनास आले. ही माहिती पाेलीस सर्व परिसरात चाैकाचाैकात थांबवून नागरिकांना देत होते.
दरम्यान, याआधीही अहमदनगर शहरालगत असणाऱ्या चांदबीबी महाल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं होतं. अनेकांनी चांदबीबी महाल परिसरात बिबट्या पाहिलाही होता. त्यानंतर आता नगर शहरातच बिबट्याने प्रवेश केल्याने वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. आज सकाळी बिबट्याच्या धास्तीने फिरण्यासाठी येणाऱ्या बहुतांस लाेकांनी दांडी मारल्याचे दिसून आले आहे.