Download App

छत्री घेवूनच बाहेर पडा! आज मुसळधार कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Rain Update IMD Issues Orange Alert : मागील दोन महिन्यांपासून जोरदार पाऊस (Rain Update) पडतोय. राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथड्या भरून वाहत आहे. पुढील चार दिवस पावसाचा हा जोर कायम (IMD Issues Orange Alert) राहणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. राज्यात घाटमाथ्यासह नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला (Maharashtra Rain) आहे. तर पालघरमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

रायगड, रत्नागिरी, पुणे घाट माथा, सातारा घाटमाथा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. वादळासह मोठ्या पावसाची शक्यता असल्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मोठी बातमी! इस्रायलकडून गाझामध्ये हवाई हल्ले; लहान मुलांसह 33 जणांचा मृत्यू

पुढे हवामान कसे राहणार?

कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भामध्ये 7 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात 8 जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भामध्ये 9 जुलै आणि 10 जुलै रोजी तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.

बर्मिंगहॅममध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; 336 धावांनी इंग्लंडला नमवलं, मालिकेत बरोबरी…

पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, IMD ने पाच ते आठ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे . कोकण, घाटमाथा आणि विदर्भ भागात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांची खबरदारी अत्यंत गरजेची ठरली आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भाच्या महाराष्ट्रातील रंगीत ऑरेंज अलर्ट जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि संभाव्य धोक्याचा इशारा आहे. नागरिकांनी घरे सुरक्षित ठेवून, बाहेर जाण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करावे. राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील चार दिवसही जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

 

follow us