Maharashtra Rain : राज्यातील मुंबईसह (mumbai)विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने (Rain)हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबईसह उपनगर, ठाणे(Thane), पुणे (Pune)त्याचबरोबर कोकणातील (Kokan)काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज कोकणसह पुणे जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट (yellow alert)देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Rain Update mumbai heavy rain in kokan pune yellow alert)
पॅन-आधार लिंकिंगसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा
विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी निरभ्र आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटून गेला आहे. तरीदेखील पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचा खरिप हंगाम वाया जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेचीच; ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा दावा
मुंबईमध्ये शनिवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर काही वेळासाठी वरुणराजानं विश्रांती घेतली होती. त्यानंतर आज रविवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबईच्या कोणत्याही सखल भागात अद्याप कुठेही पाणी साचलेलं नाही. अंधेरी सबवे सुद्धा सकाळपासून वाहनांसाठी व इतर नागरिकांसाठी सुरु आहेत.
कोकणामध्ये सध्या पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी काही प्रमाणात सुखावल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यामध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आजही हवामान विभागानं रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
पालघर जिल्ह्यात आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता पालघर जिल्ह्यामधील प्रमुख शहरांसह वसई,विरार महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.