Maharashtra Rain : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही पावसाचे दर्शन झालेले नाही. सध्या होत असलेला पाऊस हा सर्वत्र नाही तर काही मोजक्याच ठिकाणी होत आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अशा ठिकाणी तुफान पाऊस झाला आहे. तर राज्यात अन्य ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही. आजही हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. पालघर जिल्ह्यासाठीही ऑरेंज अलर्ट कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.
समृध्दी महामार्गावरील अपघातातून सरकारने धडा घेतला नाही; जयंत पाटलांचं सरकारवर टीकास्त्र
राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार बरसत असलेला पाऊस आता थांबला असतानाच हवामान विभागाने नवा इशारा दिला आहे. कोकण विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचा राज्यातील पावसावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज (गुरुवार) पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. 3 ऑगस्ट नंतर कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमकुवत होईल. त्यामुळे पुढील दोन आठवडे कदाचित पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस महत्वाचे असून या काळात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता मात्र आहे.
सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये…