Maharashtra Rain Update : गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rain Update) दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्यात आता एक दिलासादायक बातमी आली आहे. ती म्हणजे कोकण, मुंबई आणि पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित राज्यात देखील पावसासाठीच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Raj Thackeray : ‘इथे सरकारचं चुकलं हे निश्चित’; लाठीमाराच्या घटनेवर राज ठाकरेंनी फटकारलं
दिलासादायक! मुंबई-पुण्यात पावसाचं आगमन…
आज मुंबईच्या काही भागामध्ये पावसाने (Maharashtra Rain Update) हजेरी लावली. हाजी अली भागात या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र आता ही वाहतूक सुरळीत सुरू आहे. पहाटेपासूनच या संततधार पावसाला सुरूवात झाली होती. या पावसामुळे शहरातील गेलया काही दिवसांपासून निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत झाली आहे.
Maratha Agitation : पोलीस फोर्स हटवला; तणावपूर्ण शांततेत मनोज जरांगेंचे आंदोलन पुन्हा सुरु
पुण्यातही मध्यरात्रीपासून पाऊस…
मुंबईसह पुण्यामध्ये देखील पावसाचं (Maharashtra Rain Update) पुनरागमन झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवाकत झाली आणि आज पावसाने जोर धारला. त्यामुळे सकाळी कामावर जाण्याऱ्यांना त्यामुळे अडचणी देखील निर्माण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात पावसाने दडी मारली होती. पुणे शहरातील सर्व भागामध्ये पाऊस होत आहे.
राज्याच्या काही भागातही पावसाने (Maharashtra Rain Update) हजेरी लावल्याने सप्टेंबर महिण्याची सुरूवात चांगल्या पावसाने झाली आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात न पडलेल्या पावसाचा बॅकलॉग सप्टेंबरमध्ये भरून काढावा अशी आपेक्षा आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये उद्यापासून कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे 8 ते 10 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.