Download App

शिवधनुष्य बाळासाहेबांनाच पेलवले, एकाला तर झेपलेच नाही; चिन्हाच्या वादावर राज ठाकरे बोलले..

Raj Thackeray : मला संपूर्ण पक्ष हातात पाहिजे होता. इतकेच काय तर शिवसेनाप्रमुखपद पाहिजे होते अशा काही गोष्टी माझ्याबद्दल पसरवल्या गेल्या. पण, खरे सांगतो या गोष्टींचा मी कधी स्वप्नातही विचार केला नाही. हे जे शिवधनुष्य होते ते फक्त बाळासाहेबांनाच पेलवले. एकाला झेपले नाही दुसऱ्याचे काय होईल माहिती नाही. आज जी परिस्थिती दिसत आहे त्यावेळीही तसाच प्रकार सुरू होता, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

राज ठाकरे आज शिवतीर्थावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, जे मनसेला हा संपलेला पक्ष आहे असे म्हणत होते. आज शिवतीर्थाचा कोपरान् कोपरा भरलेला दिसला असेल. तेव्हा हा काय संपलेला पक्ष आहे का, जे असे बोलले आज त्यांची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही पाहत आहात. मागील दोन वर्षांपासून राजकारणाचा जो बट्ट्याबोळ झाला आहे तो आपण पाहतच आहोत. हे सगळे पाहत असताना मनाला मात्र फार वेदना होत आहेत.

वाचा : Raj Thackeray तर महाराष्ट्राची अवस्था बिहार सारखी होण्याची भीती!

माझा वाद बडव्यांशीच होता 

राज्यातील राजकारण पाहून मनाला वेदना होत होत्या. त्या वेळेस शिवसेना व धनुष्यबाण हे तुझे का माझे हे ज्यावेळी चालू होते त्यावेळी वेदना होत होत्या. लहानपणापासून तो पक्ष पाहत आलो. तो पक्ष मी जगलो. मला आठवते की दुसरीत असताना माझ्या खिशावर वाघ असायचा. राजकारण लहानपणासून पाहात आणि अनुभवत आलो बाळासाहेबांबरोबर. असंख्य लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली शिवसेना होती. पक्षातून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या पहिल्या भाषणात म्हणालो होतो, की माझा वाद हा  बडव्यांशी आहे. ही जी चार टाळकी आहेत ना ती हा पक्षात खड्ड्यात घालणार आणि त्यात वाटेकरी होण्याची माझी इच्छा नाही असे म्हणत मी बाहेर पडलो.

 माझ्याविरोधात कट 

माझ्याविरोधात काही गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या गेल्या. राज ठाकरेला पक्ष पाहिजे होता. शिवसेनाप्रमुख पद पाहिजे होते. हे सगळे खोटे आहे. माझ्या स्वप्नातही असे कधी आले नाही.  ते शिवधनुष्य होते ते शिवधनुष्य फक्त बाळासाहेबांना सोडून कोणालाच झेपणार नाही. एकाला झेपले नाही त्यानंतर आता दुसऱ्याचे काय होणार माहिती नाही.

Raj Thackeray : मनसेच्या वाट्याला कुणी जायचं नाही, गेलं ना मुख्यमंत्रीपद..

मी तोंड उघडले तर झेपणार नाही 

राज ठाकरे म्हणाले, की मला घरातील गोष्टी बाहेर आणायच्या नाहीत. तेव्हा माझे बोलणे झाले की तुम्ही तोंड उचकटू नका. नाहीतर मी तोंड उघडले तर ते तुम्हाला कुणालाच झेपणार नाही. तुम्हाला फक्त महाबळेश्वरचाच प्रसंग आठवतो पण त्याआधी काय घडले हे सुद्धा तुम्हाला सांगणे गरजेचे आहे. त्यासाठीच मी येथे आलो आहे. त्याआधी काय घडले होते हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर तुमतच्याही लक्षात येईल की ही परिस्थिती का निर्माण झाली आहे.

Tags

follow us