Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) आता काय जबाबदारी आहे ते मला माहिती नाही. आधी ते विरोधी पक्षनेते होते. उत्तम विरोधी पक्षनेते होते. नंतर मुख्यमंत्री झाले. आता उपमुख्यमंत्री झाले. नंतर पाहिले की ते फुटलेल्या गटाच्या मुख्यमंत्र्याची गाडी चालवत होते. त्यांच्यावर केंद्राने काय काय जबाबदाऱ्या टाकल्या आहेत ते पहावे लागेल. पण फार चांगला माणूस आहे देवेंद्र फडणवीस. मला त्यांची दया येते कीव येते. अशा प्रकारे त्यांच्यावर जी वेळ आली आहे त्यावर मी ईश्वराकडे प्रार्थना करतो त्यांना लवकर या संकटातून सोडवावं, अशा खोचक शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. (Shivsena MP Sanjay Raut criticized Devendra Fadnavis on his political behaviour)
‘जे सोडून गेले त्यांना पुन्हा घेणार का?’ राऊतांनी सांगितला उद्धव ठाकरेंचा निर्णय
खासदार राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर शेलक्या शब्दांत टीका केली. यावेळी अर्बन नक्षलवादाच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी फडणवीसांना घेरले. अर्बन नक्षलवादाला जबाबदार कोण?, गृहमंत्री कोण आहेत? हे तुमचे अपयश आहे. तुमच्या व्यवस्थेविरोधात हे बंड आहे. सरकार कष्टकरी, शेतकरी बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरतेय त्यामुळे अशी वृत्ती, प्रवृत्ती राज्यात फोफावत आहे. हे तुमच्या सरकारचे अपयश आहे. नक्षलवादाच्या नावाखाली निरपराध लोकांना अटक करताय. खोट्या प्रकरणात गृहखात्याचा वापर करून तुम्ही लोकांना नक्षलवादी ठरवत आहात, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
पटोले, राऊत बोलघेवडे लोक – फडणवीस