Download App

‘ही तर शिंदे सरकारच्या कंबरड्यात शेतकऱ्यांनी मारलेली पहिली लाथ’; राऊतांचा घणाघात !

Sanjay Raut News : राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यंदाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळालं असून शेतकऱ्यांनी शिंदे सरकारच्या कंबरड्यात मारलेली ही पहिली लाथ आहे,अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आढावा, ‘आग्र्यात आंतरराष्ट्रीय केंद्र उभारणार’

राऊत पुढे म्हणाले, बाजार समिती ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी संस्था आहे. यंदा या निवडणुकीत आघाडीला निर्विवाद यश मिळालं आहे. याचा अर्थ ग्रामीण भागातील शेतकरी शिंदे-फडणवीस सरकारला वैतागले आहेत. शेतकऱ्यांनी सरकारच्या कंबरड्यात मारलेली ही पहिली लाथ आहे. विशेष म्हणजे, मिंधे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात आमचे पॅनल विजयी झाली आहेत. यावरून शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, हे स्पष्ट आहेस, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला.

बाजार समितीचे निकाल तर केवळ सुरुवात आहे. आगामी काळात महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Mann ki Baat : आज 100 वा भाग; दिल्लीपासून थेट UN पर्यंत आवाज पोहोचणार

हिंमत असेल तर निवडणुका घ्या

सरकारला इशारा देताना राऊत म्हणाले, आम्ही सारखे म्हणत आहोत की हिंमत असेल तर शिंदे-फडणवीस सरकारने निवडणुकांना सामोरे जावे. पण, या सरकारला पराभवाची भीती वाटत असल्याने या निवडणुका लांबणीवर पडत आहेत.

Tags

follow us