Mann ki Baat : आज 100 वा भाग; दिल्लीपासून थेट UN पर्यंत आवाज पोहोचणार

Mann ki Baat : आज 100 वा भाग; दिल्लीपासून थेट UN पर्यंत आवाज पोहोचणार

Mann ki Baat 100 Episod : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat)रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित केला जाणार आहे. एकूण 30 मिनिटांच्या या कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी आला होता. तेव्हापासून, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी एक भाग थेट प्रसारित केला जातो.

देवदत्त निकम यांचा सनसनाटी विजय; वळसे पाटलांना धडकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ प्रसारणाचा 100 वा भाग हा अभूतपूर्व बनवण्यासाठी भाजपने (BJP)सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. देशभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी 100 ठिकाणी ऐकण्यासाठी सुविधांचे आयोजन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदींचे भाषण ऐकण्यासाठी भाजपने विदेशासह सुमारे 4 लाख ठिकाणी व्यवस्था केली आहे.

मन की बातच्या 100 व्या भागाचे औचित्य साधून विज्ञान भवन येथे एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन उपाध्यक्ष जगदीप धनखड यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Home Minister Amit Shah), रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav)आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Information and Broadcasting Minister Anurag Thakur)उपस्थित होते.

मन की बातचा 100 वा भाग संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनने ट्विट केले की, ऐतिहासिक क्षणासाठी सज्ज व्हा. पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी युनायटेड नेशन्स मुख्यालयातील ट्रस्टीशिप कौन्सिल चेंबरमधून थेट प्रक्षेपित केला जाईल.

न्यूयॉर्कमध्ये रविवारी रात्री 1.30 वाजता प्रक्षेपण होणार आहे. यूएन मुख्यालयात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ही एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व घटना असेल, असे भारतीय मिशनने म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube