Download App

शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलंय, त्यांनी लकव्याबाबत.. राऊतांचा घणाघात

Sanjay Raut replies Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलं आहे. त्यांचे सगळे अवयव बंद पडले आहेत. त्यांनी धोरण लकव्याबाबत चर्चा करू नये, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रत्युत्तर दिले.

राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी राऊत यांनी फडणवीस यांनी तत्कालीन आघाडी सरकावर केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात सध्या सरकार आहे का. आमच्या सरकारला निर्णय लकवा झाला होता, शिंदे फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलंय. डोळे बंद आहेत, कान बंद आहेत. त्यांनी लकव्याच्या गोष्टी करू नयेत.

‘राजवाडा’ शब्दावरून पुण्यात राडा; भाजपला भिडायला निघालेल्या काँग्रेसच्या मावळ्यांना पोलिसांनी अडवलं

फडणवीस नेमकं काय म्हणाले ?

उपमुख्यमंत्री फडणवीस काल नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. निळवंडे धरणाच्या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी फडणवीस म्हणाले, की मागील अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. हे सरकार कुठलाही निर्णय घेत नव्हतं. कोणताही निर्णय न घेणं हाच एक निर्णय त्यांनी घेतला होता. या सरकारला निर्णय लकवा झाला होता. त्यामुळे कोणतेच निर्णय घेतले जात नव्हते.

किर्तीकरांनी त्यांचं वाक्य पुन्हा ऐकावं

खासदार गजानन किर्तीकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपकडून भेदभाव केला जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी या वक्तव्यावर यु टर्न घेत मी असे वक्तव्य केले नसल्याचे सांगितले. खासदार गजानन किर्तीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरही राऊत यांनी भाष्य केले. किर्तीकर जे बोलले ते मी ऐकलंय. त्यांनीही ते परत ऐकावं. किर्तीकर हे आमच्या इथे ज्येष्ठ होते परंतु तिथे ते आहेत की नाही माहिती नाही. किर्तीकर यांनी त्यांचे वक्तव्य ऐकावं. त्यांच्यासारखे ज्येष्ठ नेते जेव्हा बोलतात तेव्हा त्यामागची कथा स्पष्ट असते.

रडगाण्याला कुणीही विचारत नाही, राजकारणातून संन्यास घ्या; राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला

Tags

follow us