रडगाण्याला कुणीही विचारत नाही, राजकारणातून संन्यास घ्या; राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला

रडगाण्याला कुणीही विचारत नाही, राजकारणातून संन्यास घ्या; राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला

Sanjay Raut : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भारतीय जनता पार्टीबाबत केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधी पक्षांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, पंकजा मुंडे भाजपमध्ये आहेत. पण भाजपा त्यांना आपलं मानत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. गोपीनाथ मुंडेंनी राज्यात भाजपा उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. त्यांनी राज्यात भाजपला आजचे दिवस दाखवले.

दिल्लीतील पुतळा हटवल्यानंतर सरकारला उपरती; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, महादेवराव शिवणकर अशा बहुजन समाजातील नेत्यांनी महाराष्ट्रात भाजप शून्यातून उभा केला. शिवसेनेबरोबर युती करून हा पक्ष सत्ताधारी केला. पण त्या मुंडे परिवाराचे राजकारणात अस्तित्व राहू नये यासाठी दिल्लीत आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांचा पराभव का आणि कसा झाला यावर आम्ही वेगळं बोलण्याची गरज नाही. कारण, तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे, असे राऊत म्हणाले.

राजकीय कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घ्यायला हवा. तरच त्यांचं अस्तित्व टिकून राहील. नाही तर तुम्ही राजकारणातून संन्यास घ्यायला हवा. आमच्यावर अन्याय होतोय अशा रडगाण्याला कुणीही विचारत नाही, असे राऊत म्हणाले.

.. म्हणून नगर जिल्ह्याचं नाव बदललं 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र आणि देश कायम ऋणी आहे. उत्तम राज्यकर्त्या, उत्तम प्रशासक, धर्मपरायण अशा त्या राज्यकर्त्या होत्या. पण दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांचा फोटो हटविण्याचा जो प्रयत्न झाला त्यानंतर सरकारला उपरती आली. अहिल्यादेवींच्या नावाने एखादा जिल्हा ओळखला जाणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो.

महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा ही या देशाची भावना आहे. याबाबत खरं तर पंतप्रधान आणि केंद्र सरकारने भूमिका घ्यायला हवी. पण त्यांना प्रधानमंत्री आणि केंद्र सरकारच न्याय नाकारत आहे.

BJP : पक्ष माझा नाही; सूचक विधान करत पंकजा मुंडेंनी वाढवलं भाजपचं टेन्शन

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube