BJP : पक्ष माझा नाही; सूचक विधान करत पंकजा मुंडेंनी वाढवलं भाजपचं टेन्शन

BJP : पक्ष माझा नाही; सूचक विधान करत पंकजा मुंडेंनी वाढवलं भाजपचं टेन्शन

Pankaja Munde : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत असतात. स्वतः मुंडे यांनी ही नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी भाजपची आहे पण, भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. राष्ट्रीय समाज पक्ष माझं माहेर आहे. माझ्या भावाचं घर आहे. वडिलांशी लढाई झाली तर भावाच्या घरीही जाऊ शकते, अशा सूचक शब्दांत त्यांनी भाजपला इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी सूचक वक्तव्य करत भाजपल इशारा दिला आहे.

गोपीनाथ मुंडे असते तर मी आज… रासपचे नेते महादेव जानकरांचं मोठं विधान

तुम्ही म्हणताय ताईची पार्टी, ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पार्टी माझी होऊ शकत नाही. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला. आणखी काय होईल ? आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, असेही मुंडे म्हणाल्या.

मुंडे पुढे म्हणाल्या, महादेव जानकरांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी मी पक्षाकडे आग्रह धरला होता. जानकरांना कॅबिनेट मंत्री बनविण्याचे मुंडे साहेबांचे स्वप्न होते. आणि ते मी पूर्ण करून दाखवले. मी जानकर यांना राज्यमंत्री पद नाही तर कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं पाहिजे असा आग्रह धरला होता. त्यामुळे जानकरांना कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube