Sanjay Shirsat News : ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुंबईत घेतलेल्या फ्लॅटवरून राजकारणात गदारोळ उठला आहे. संजय शिरसाट यांनी मुंबईत 72 व्या मजल्यावर कुणासाठी बंगला घेतलाय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare) यांनी विचारला होता. त्यावर आता शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
शिरसाट म्हणाले, कोण रुपाली पाटील ?, मी तिला ओळखत नाही, तिला कधी भेटलोही नाही. मुंबईत घर नाही घ्यायचे तर मग रस्त्यावर रहायचे का, असा सवाल उपस्थित करत काय चौकशी करायची ती करा, असे आव्हान शिरसाट यांनी दिले.
खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स
रुपाली पाटील यांच्या आरोपांवर शिरसाट म्हणाले, मी रुपाली पाटीलला ओळखत नाही. मी मुंबईत दोन घरं कशाला घेतली असे प्रश्न विचारले जात आहेत. मग आम्ही मुंबईत रस्त्यावर राहायचे का, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणी चौकशी करायची असेल तर करा. महिलांना स्वातंत्र्य दिले याचा अर्थ त्यांनी कुणाबद्दल काहीही बोलावे हे अजिबात चालणार नाही असे त्यांनी सांगितले.
राघव चड्डा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा झाला? ‘आप’ खासदाराच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण
दरम्यान, संजय शिरसाट यांनी काल शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरूनही चांगलाच गदारोळ उठला आहे. त्यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील शिरसाट यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.