मुंबई : सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. ही लाट राज्यातील विदर्भासह मराठवाड्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आता या दरम्यान राज्यावर थेट दुष्काळाचं सावट पडणार असल्याचाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अमेरिकेतील हवामानविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. नॅशनल ओशनिक अॅंड अॅटसॉस्पेरिक अॅडमिनिस्ट्रेशन ((National Oceanic and Atmospheric Administration) असं या संस्थेचं नाव आहे. यावर्षी महाराष्ट्रात एल निनोचा (El Nino) प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे मान्सूनवर (Monsoon) त्याचा परिणाम होणार आहे. जेणे करून राज्यात दुष्ळाळ (Maharashtra Drought) पडण्याची शक्यता आहे.
अवकाळीनंतर राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, येणार उष्णतेची लाट
जून ते डिसेंबर महिन्यात तब्बल 55 ते 60 टक्के एल निनोचा (El Nino) प्रभाव जाणवण्याची शक्यता असल्याचं या संस्थेने सांगितलं. याबद्दल मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी माहिती दिली. मात्र यासाठी त्यांनी बारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची वाट पाहणार असल्याचं देखील सांगितलं आहे. कारण त्यामध्ये जर अशा प्रकारे महाराष्ट्रात एल निनोचा (El Nino) प्रभाव जाणवणार असल्याचं सांगितल्यास त्याबद्दल माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं.