Download App

BJP : नाशिकमध्ये तोंड पोळल्यानंतर पुण्यात भाजपनं ताकही फुंकून प्यायलं

पुणे प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी )

BJP Maharashtra Meeting at Pune :  पुण्यात भाजपची राज्य कार्यकारिणी झाली . या कार्यकारिणीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भाषण झाली . जी झाली ती देखील अतिशय मोजकी आणि निटनेटकी झाली. नाराजी चव्हाट्यावर येणार नाही याची पुरेपुर काळजी पुणे कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आली होती. भाजपची नाशिक येथे तीन महिन्यापूर्वी कार्यकारिणी झाली. या कार्यकारिणीत गेल्या सात वर्षात झाली नाहीत अशी भाषण झाली. आशिष शेलार , प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांच्यासह अनेकानी भाजप मधील अंतर्गत गटबाजी व्यासपीठावर मांडली होती.

सिद्धरामय्या मुख्यमंत्री : शिवकुमारांचं खच्चीकरण की काँग्रेसची राजकीय खेळी?

आशिष शेलार यांनी संधी मिळत नसल्याचे सुचक विधान केल होत . पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी कार्यलर्त्यांकडे कसे दुर्लक्ष होत आहे याचा जोरदार समाचार घेतला होता. या सर्व भाषणावर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी यांनी टाळ्या वजावत जोरदार प्रतिसाद दिला होता. गेल्या सात आठ वर्षात भाजपाच्या कार्यकारिणीत अस मतप्रदर्शन झाल नव्हत. त्यावेळी प्रदेश पातळीवर याची दखल घेण्यात आली होती.
गेल्या काही दिवसापासून भाजप मध्ये मंत्री पदावरुन तयार होत आलेली नाराजी, कार्यकारिणीत समावेश न झाल्याने नाराज झालेले नेते, नगर मध्ये वाद , निधी वरून आमदाराने उपमुखमंत्री याना लिहलेल पत्र , अशा अनेक आघाडीवर नाराजी पक्षात धुसपुसत आहेत.

Pune BJP State Executive Meeting : कसलीही अपेक्षा करू नका; मंत्रिपद मागणाऱ्यांना फडणवीसांनी दिला थेट इशारा

अशा परिस्थितीत पुणे येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीत या सर्व बाबी ची खबरदारी घेण्यात आली होती. कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय पदाधिकारी , सुधीर मुनगंटीवार , प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस आणि जे पी नड्डा वगळता कुणालाही बोलण्याची संधी मिळाली नाही.

या बैठकीत ३० मे पासून ३० जुन पर्यंत बूथ रचना कशी असावी त्याना कस ऍक्टीव्ह करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले . ही संपूर्ण काम लवकर पुर्ण करावे असे आदेश देण्यात आले. या कार्यक्तिनित कुठल्याही पातळीवर नाराजी उफाळून येमार नाही याची काळजी घेण्यात आली होती.

Tags

follow us