Maharashtra ST च्या प्रवासाचे साक्षीदार हरपले, पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

Maharashtra STs First Conductor passed away : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ( Maharashtra State Transport ) बस ज्या बसला आपण लालपरी म्हणून ओळखतो. त्या एसटीच्या प्रवासाचे गेल्या 75 वर्षांचे साक्षीदार असलेले पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन झालं आहे. Sanjay Gaikwad :’एकनाथ शिॆदेच्या पैशांवर…’ राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचा धक्कादायक खुलासा नगर महाराष्ट्र परिवहन […]

Untitled Design   2023 05 18T105519.713

Untitled Design 2023 05 18T105519.713

Maharashtra STs First Conductor passed away : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ( Maharashtra State Transport ) बस ज्या बसला आपण लालपरी म्हणून ओळखतो. त्या एसटीच्या प्रवासाचे गेल्या 75 वर्षांचे साक्षीदार असलेले पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन झालं आहे.

Sanjay Gaikwad :’एकनाथ शिॆदेच्या पैशांवर…’ राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचा धक्कादायक खुलासा

नगर महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे पहिले वाहक असलेल्या लक्ष्मण केवटे यांनी वयाच्या 97 व्या वर्षी बुधवारी 17 मे ला रात्री अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी अहमदनगरमधील नालेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. माळीवाडा येथील निरफराके गल्लीत ते राहत होते. तेथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

CM Shinde : वाहतूक पोलिसांसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा महत्त्वाचा निर्णय

1948 साली महाराष्ट्रात गाव खेड्यांना जोडणाऱ्या एसटीची सुरूवात झाली. 1 जून 1948 ला पुणे-नगर मार्गावर राज्यातील पहिली एसटी धावली. त्यावेळी पहिल्या एसटीचे चालक तुकाराम पठारे आणि वाहक म्हणून लक्ष्मण केवटे यांनी काम केले आहे. अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक आणि वाहक दोघेही अहमदनगरचे होते. लक्ष्मण केवटे हे एसटी महामंडळातून 30 एप्रिल 1984 रोजी सेवानिवृत्त झाले होते.

आजारपणात वाहक केवटे यांचा वैद्यकीय खर्च एसटी महामंडळाकडून करण्यात आला आहे. अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे ते वाहक होते. एसटीची पहिली बस ते आताची ई -बस या प्रवासाचे ते साक्षीदार होते.

Exit mobile version