Sanjay Raut : ठाण्यात जे चाललंय ते आधी थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजपकडून (BJP) मुख्यमंत्र्यांचा वापर करून घेतला जात आहे. हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हा किती मोठी चूक केलीत ते. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असाल तर हे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभत नाही. मी चांगलंच बोलतो त्यामुळे हा शुभ संदेश मी त्यांना देत आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Sanjay Raut) यांना ललकारले.
हे सुद्धा वाचा : Gopichand Padalkar : संजय राऊत हा वेडा झालेला माणूस, पडळकरांची टीका
राऊत पुढे म्हणाले, की हा राडा ठाण्यातच सुरू आहे. कारण या गटाचे अस्तित्व ठाण्यापुरतेच मर्यादीत आहे. सत्तेचा आणि पोलीस बळाचा गैरवापर केला जात आहे. पोलिसांच्या आडून हल्ले करू नका मर्द असाल तर समोरून येऊन लढा. हे स्वतःल् शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्यांचे काम नाही. सध्या असे प्रकार फक्त ठाण्यातच सुरू असून ते देखील लवकरच संपतील, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत मानसिक तणावात म्हणून ते शिव्या देतायत..
भगवा रंग तर आम्हाला प्रिय आहेच मात्र कोणत्याही रंगाची मक्तेदारी कोणाकडेही नाही. सर्व रंग हे निसर्गाने दिलेले आहेत. मात्र, शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला भगव्यावर प्रेम करायला शिकवले. त्यामुळे भगवा प्रियच आहे, असे राऊत म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झालेल्या सभेमुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मुळात सत्ताधारी बेकादयदेशीर आहेत त्यांना काय सांगणार, असा टोलाही त्यांना लगावला.
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यापासून संजय राऊत मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप विरोधात जास्तच आक्रमक झाले आहेत. सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाचा पाराही चांगलाच वाढला आहे. राऊत यांनी याआधीही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता ठाण्यातील प्रकारावरून त्यांनी थेट शिंदे यांना आव्हान दिले आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.