अभिमानास्पद! नगरसह राज्यातील तीन शाळा जगातील टॉप 10 शाळांच्या यादीत

Worlds Best Schools : जगातील दहा सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये एकट्या भारतातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यातही अभिमानाची बाब म्हणजे या पाच शाळांपैकी तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेच्या शाळेचाही यामध्ये समावेश आहे. युकेमध्ये या वर्ल्ड बेस्ट स्कूलचे आयोजन करण्यात आले आहे. पाच कॅटेगरीमध्ये या शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पर्यावरण […]

School Bus

School Bus

Worlds Best Schools : जगातील दहा सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये एकट्या भारतातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यातही अभिमानाची बाब म्हणजे या पाच शाळांपैकी तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेच्या शाळेचाही यामध्ये समावेश आहे. युकेमध्ये या वर्ल्ड बेस्ट स्कूलचे आयोजन करण्यात आले आहे. पाच कॅटेगरीमध्ये या शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पर्यावरण कृती, नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे, निरोगी जीवनासाठी प्रयत्न आणि सर्वसमावेशक सहकार्य या घटकांचा समावेश आहे. यावर्षी निवडण्यात आलेल्या जगातील दहा सर्वोत्तम शाळांपैकी पाच शाळा भारतातील आहेत.

आम आदमी विमा योजनेचा लाभ कसा मिळवावा?

यामध्ये नवी दिल्लीतील नगर निगम प्रतिभा विद्यालय, मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल, अहमदाबाद येथील रिव्हरसाइड स्कूल तसेच अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूल हे एचआयव्ही, एड्सग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबातील मुलांना शिकवते. पाचवी शाळा मुंबईतील आकांक्षा फाउंडेशनची शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या यादीत विविध कॅटेगरीतून 10 शाळा निवडण्यात आल्या आहेत. प्रत्येक कॅटेगरीतील 3 शाळांची घोषणा या पुरस्कारातून करण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये ही घोषणा होईल. यानंतर विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये होईल. पाच कॅटेगरींनुसार पाच पुरस्कार मिळणार आहेत. अडीच लाख अमेरिकी डॉलर एवढी बक्षीसाची रक्कम पाच जणांमध्ये समान वाटून देण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक शाळेला 50 हजार डॉलर इतकी रक्कम मिळेल.

Exit mobile version