Download App

Video: जरांगे पाटील यांची मोठी घोषणा; निवडणूक न लढवण्याचा निर्णय, सर्वांना अर्ज मागं घेण्याच्या सूचना

अखेर आज निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. जरांगे पाटील यांनी आता आमच्या विरोधातील लोक

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व राज्याचं ज्यांच्याकडे लक्ष लागलं होत त्या जरांगे पाटील यांनी अचानक मोठा निर्णय जाहीर केला आहे. मराठा या एकाच जातीवर निवडून येणं कठीण आहे. (Manoj Jarange Patil) त्यामुळे रात्री ३ वाजेपर्यंत चर्चा करून अखेर आज निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. जरांगे पाटील यांनी आता आमच्या विरोधातील लोक पाडायचे असा निर्णय घेतला आहे.

 लढा चालू ठेवणार

रात्री तीन वाजेपर्यंत आमची बैठक झाली. या बैठकीत सर्वच बाजूने चर्चा झाली. दरम्यान, यामध्ये खोलात जाऊन चर्चा झाली. कारण एका जातीवर निवडणूक लढवणं सोप नाही. कोणत्याचं मतदारसंघात फक्त एका जातीवर निवडून येता येत नाही. त्यामुळे स्वत:च हसू करून घेण्यात काही अर्थ नाही याच्यावर विचार झाला आणि निवडणूक न लढवता लढा चालू ठेवावा यावर एकमत झालं असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत.

आज राज्यभरात बंडखोरांची मनधरणी; 3 वाजेपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत, कोणत्या पक्षात काय स्थिती?

लढ्यात 500 लोक असले काय आणि 10 हजार लोकस असले काय काही फरक पडत नाही. परंतु, निवडणुकीचं गणित फार वेगळ असतं. त्यामुळे हा निर्णय केला आहे. तो विचारपूर्वकच केला आहे. यामध्ये कुणी दु:खी होण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर माझा जो काही आरक्षणाच्या मागणीसाठी लढा सुरू आहे तो लढा कायम सुरू राहणार आहे. त्यामध्ये कसलाही खंड पडणार नाही. परंतु, त्यामध्ये मला कुणी काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला सोडणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

तीन वाजेपर्यंत अर्ज मागं घ्या

ज्या इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ते आज दुपाली 3 वाजेपर्यंत आपले अर्ज मागं घ्या. जर कुणी अर्ज मागं नाही घेतला तर तो अर्ज आणि तु. त्याच्याशी आमचा काही संबंध राहणार नाही. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना सरळ सूचना आहे की आपण आयोगाने दिलेल्या वेळेत अर्ज मागं घ्यावेत असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आता लोकसभा पॅटर्न राबवणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

follow us