Maharashtra Weather Update : राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत असतानाच (Maharashtra Weather) दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात पुढील चार दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज (Unseasonal Rain) हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पावसाने वातावरणातील उष्णता कमी होईल. मात्र हा पाऊस पिकांना नुकसानकारक ठरण्याचीही शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवसांत हिंगोली, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांत दोन दिवसांत अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता आहे.
राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात रोज वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून बचावाची आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सावधान! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांतील 96 जिल्ह्यांत येणार उष्णतेच्या लाटा; हवामानाचा विभागाचा इशारा
हवामान विभागाने देशातील 9 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 14 राज्यांमध्ये वादळ आणि पाऊस होईल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीसह 9 राज्यांतील तब्बल 96 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु, काही ठिकाणी हवामानात पुन्हा बदल होत आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती दिसून येत आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक उष्णता आहे. मात्र याच भागात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेत वाढ होईल असेही हवामान विभागाने सांगितले होते. त्यानुसार या महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. काही भागात तर तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले आहे.
सावधान! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अन् ऑरेंज अलर्ट