Download App

राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची

पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Weather Update : मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी वाढल्याचे बघायला मिळाले. (Weather) यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही तासात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.

दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, आता पाऊस धुवाधारपणे सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सर्तकेचा इशारा जारी केला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदात वर्तवण्यात आला असून रेड अर्लट जारी करण्यात आला आहे.

बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, ठाकरे बंधू रिंगणात, महायुतीला फटका बसणार?

मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस होणार आहे, यामुळे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सातारा, रायगड, पुणे, कोल्हापूरध्ये रेड अलर्ट आहे. तर मुंबई, ठाणे परभणी, नांदेड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, बीड जालना या भागात ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईमध्ये तिसऱ्या दिवशी रात्रभर पाऊस कोसळला आहे. मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा त्यामुळे मुंबई सह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत आहत. रात्रभरात ठिकठिकाणी 60 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने मध्य रेल्वे आणि हार्बल मार्गाची लोकल सेवा उशिराने सुरू आहे.

पुढील 3 तासांत रायगडमधील आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढील तासात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले. जळगावच्या पारोळा तालुक्यात काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावांमध्ये मोठे नुकसान. पळसखेडा गावात दोन्ही गावांना जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला. चिखलोड , म्हसवे तसेच शेळावे गावात चिखली नदीच्या पुराने अनेक घरांमध्ये दुकानामध्ये पाणी शिरल्याने नुकसान.

पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिके जमीनदोस्त झाली असून मोठे नुकसान झाले आहे. पळसखेडा बुद्रुक येथे पिकांसह शेतातील जमीन वाहून गेली. दोन दिवसांच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील जलसाठ्यात वाढ. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरण जलसाठ्यात सहा टक्क्यांनी वाढ. धरणातील जलसाठा 52 वरून पोहोचला 58 टक्क्यांवर मागील वर्षी यावेळी धरणातून केला होता पाण्याचा विसर्ग.

follow us