Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त असताना हवामान विभागाकडून मराठवाडासह विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याती काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची देखील शक्यता हवामान विभागकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 26 मेपर्यंत केरळ (Kerala) राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाकडून यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. माहितीनुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे.
तर दुसरीकडे आज मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आहे. आज अमरावतीमध्ये तापमना 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे.
मोठी बातमी! POCSO प्रकरणात केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक-
राज्यात मान्सून कधी?
केरळमध्ये 26 मेपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता असताना हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळ राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर तो एका आठवड्यात महाराष्ट्रात देखील दाखल होऊ शकतो. राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
