Maharashtra will receive rain again; For the next 5 days there will be heavy rain : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) आणि गारपिटीने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळं शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अजूनही अनेक भागात अवकाळी पाऊस सुरूच आहे. अशातच आता प्रादेशिक हवामान विभागाकडून (Meteorological Department) पुढील 5 दिवसांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.
भारतीय हवामान विभागाने मे महिन्याच्या अंदाजात वायव्य भारतात, पश्चिम-मध्ये भारताच्या अनेक भागांत या महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आसाम आणि मेघालयातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर कालच्या पूर्वानुमानुसार, राज्यात 3 मे रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यांत याची तीव्रता अधिक असू शकेल. या जिल्हांत विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊसची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईच्या काही भागांत काल जोरदार सर मुंबईकरांनी अनुभवली. आजही मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानंतर गुरूवारी रात्री मात्र मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारी कोरडे असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली.
‘त्या’ हालचाली थांबवण्यासाठी राजकीय निवृत्ती हा पवारांचा मास्टर स्ट्रोक; मनसेचं खबळजनक वक्तव्य
रायगड आणि रत्नागिीरी जिल्ह्यातही गुरूवारी आणि शुक्रवारी मेघगर्जेनसह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात गुरूवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तर शुक्रवारी याची तीव्रता कमी होऊ शकते. नाशिक, अहमदनगर, पुणे य़ेथे तर मराठवाड्यात नांदेड, लाातूर येथे गुरूवारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला. काही ठिकाणी गुरूवारी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि पावसाची तीव्रता वाढू शकते. याशिवाय, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगाली, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आहे.
विदर्भामध्ये 5 दिवस यलो अलर्ट आहे. उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणए, नगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमधे शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, या अतिवृष्टीपासून शेतकऱ्यांनी आपली शेती पिके वाचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.