‘त्या’ हालचाली थांबवण्यासाठी राजकीय निवृत्ती हा पवारांचा मास्टर स्ट्रोक; मनसेचं खबळजनक वक्तव्य
Pawar’s master stroke to stop the ongoing political movement in Maharashtra politics : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा काल प्रकाशन सोहळा झाला. या कार्यक्रमात पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
या घोषणेनंतर सभागृहात आक्रोश झाला. कार्यकर्ते भाऊक होऊन रडायला लागले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले. पुढे कार्यकर्त्यांनी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी धरणं धरलं.
त्यानंतर मात्र, पवारांनी आपल्याला विचार करण्यासाठी 2-3 दिवसांचा वेळ मागितला. 2-3 दिवसाानंतर ते आपला निर्णय जाहीर करणार आङेत. त्यानंतर आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं. पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मनसेचीही प्रतिक्रिया आली.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हा पवारांचा मास्टस्ट्रोक असू शकतो, असं विधान केलं. सध्या राज्याच्या राजकारणात ज्या अफवा चालू होत्या, ज्या हालचाली सुरू होत्या, त्या थांबवण्यासाठी ही खेळी असावी, असं खळबळजनक वक्तव्यं केलं.
फाशीऐवजी कशी देता येईल मृत्यूची शिक्षा? सुप्रीम कोर्ट शोधतेय वेगळा पर्याय
ते म्हणाले, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर भाष्य करण्यासाठी मी एवढा मोठा नाही. त्यांच्या निवृत्तीचा निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून बोलायंच झालं तर त्यांचं वय किंवा त्यांच्या तब्येतीचा विचार करून हा निर्णय घेतला असावा. काही दिवसांपूर्वीचे मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी पवारांचं कौतूक केलं होतं. शरद पवार हे कामात वाघ आहेत, ते काम करतात, असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, कुठंतरी थांबायला हवं, त्यामुळं पवार थांबले असावेत, असं पाटील यांनी सांगितलं. सध्या ज्या हालचाली राज्यात सुरू होत्या, त्या अफवा असतील तर त्या कुठेतरी थांबाव्यात, त्यासाठी त्यांनी मास्टरस्ट्रोक खेळला असेल, अशी शक्यता असल्याचं पाटील म्हणाले.
दरम्यान, आता राजू पाटील यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस काय उत्तर देते हेच पाहणं महत्वाचं आहे.