Maharashtra Winter Session 2025 : IndiGo चा नागपूर अधिवेशनाला फटका, आमदार- अधिकाऱ्यांची तिकिटे रद्द

Maharashtra Winter Session 2025 : देशातील सर्वात मोठी विमान सेवा देणारी कंपनी इंडिगो गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडली आहे.

Maharashtra Winter Session 2025

Maharashtra Winter Session 2025

Maharashtra Winter Session 2025 : देशातील सर्वात मोठी विमान सेवा देणारी कंपनी इंडिगो गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडली आहे. क्रू मेंबरची कमतरता असल्याने कंपनीला अनेक उड्डाणे रद्द करण्यात येत आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांकडे येणारी आणि जाणारी उड्डाणे इंडिगोकडून रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे आता इंडिगो कंपनीच्या गोंधळाचा मोठा फटका उद्यापासून (8 डिसेंबर) सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला देखील बसताना दिसत आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचा हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2025) 8 डिसेंबरपासून राज्याची उपराजधानी नागपूर येथे सुरु होत आहे. या अधिवेशनाला पोहचण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी फ्लाइट्सची तिकिटे बूक केली होती मात्र अचानक तिकिटे रद्द झाल्याने आमदार आणि अधिकाऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. ऐन वेळी विमाने रद्द झाल्याने आमदार आणि अधिकाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकिटं अचानक रद्द झाली आहे. त्यामुळे आता आमदारांना नागपुराला जाण्यासाठी कार किंवा इतर पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबई, नागपूर शहरात येणारी किंवा जाणारी फ्लाइट्स अचानक रद्द होत किंवा तासंतास उशीर होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरु

महाराष्ट्र विधिमंडळाचा हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु होत असून 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात पार्थ पवार जमीन घोटाळ्यावरुन तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन आणि राज्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या आलेखावरुन महायुती सरकारला घेरण्याचे प्रयत्न करणार आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. दुसरीकडे आचारसंहितेचं कारण दाखवून सरकार या अधिवेशनात कोणतीही घोषणा करु शकत नसल्याने सरकार हिवाळी अधिवेश 7 दिवसात गुंडाळणार असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.

सलग दुसऱ्या रात्री अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर संघर्ष सुरू, चार जण ठार तर 80 हून अधिक जखमी

दोन्ही सभागृहे विरोधी पक्षनेतेविना

राज्यातील इतिहासात पहिल्यादा दोन्ही सभागृहे विरोधी पक्षनेतेविना होणार आहे. विधानपरिषद आणि विधानसभेत विरोधी पक्षनेते नसल्याने दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते देण्यात यावी अशी मागणी आता विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या अधिवेशानत सरकारला कोणत्या मुद्यावर टार्गेट करायचे यासाठी विरोधकांची बैठक शासकीय निवासस्थानी झाली.

Exit mobile version