Download App

चारशे एकरमध्ये भव्यदिव्य होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

प्रफुल्ल साळुंखे
(विशेष प्रतिनिधी),

Maharashtra Bhushan puraskar Sohala : राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण – २०२२ पुरस्कार निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी याना प्रदान करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी नवी मुंबईतील खारघर कॉर्पोरेट पार्क जय्यत तयारी करण्यात येते आहे. चारशे एकर पार्कमध्ये हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी २० लाख लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकांची ने-आण करण्यासाठी ३०० बस आणि शेकडो चार चाकी वहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. एम एम आर खेत्रातील ८ महापालिका, सिडको, ठाणे, रायगड , रत्नागिरी जिल्हा प्रशासन , रायगड पालकमंत्री , ठाणे पालकमंत्री स्मभुराज देसाई, आणि मंत्री रविन्द्र चव्हाण हे आठवडा भर तळ ठकुन आहेत. यांच्या सोबत किमान २० हजार कर्मचारी तीन दिवस अहोरात्र काम करत आहेत.

वैद्यकीय केंद्र आराखाडा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकांची उपलब्धता, औषध उपलब्धता, आरक्षित रुग्णालये, वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा याबाबत देखील मंत्री महोदय पाठपुरावा करीत आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी एकूण ५५ वैद्यकीय केंद्रे असणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खारघर येथील गोल्फ कोर्स येथे ८ हॅलीपॅड उभारण्यात आले आहेत. तसेच कॉर्पोरेट पार्क मध्ये भव्यदिव्य अशा स्वरूपाचे स्टेज उभारले जात आहेत. याकरिता ४ ते ५ हजार कामगार गेले ४ दिवस काम करीत आहेत.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी अंदाजे ७० कोटी रुपये खर्च केला जात असून भव्यदिव्य असा सोहळा पार पडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि इतर आस्थापनांचे अधिकारी व कर्मचारी स्वतः हजर राहून देखरेख करीत आहेत. या ठिकाणी त्यांच्यासाठी वेगवेगळे टेन्ट बांधण्यात आले आहेत तसेच पोलीस अधिकाऱ्यांसाठी देखील टेन्ट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासनासह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात आल्यामुळे कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला जवळपास १० हजार लोकांची उपस्थिती याठिकाणी पाहण्यास मिळाली आहे. खारघर परिसरातील ठिकठिकाणी श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम देखील राबिवली जात आहे.

Maharashtra Bhushan Puraskar वादात, पुरस्कार परत घ्या अन्यथा आंदोलन करणार

खारघर मधील कार्यक्रमाच्या ठिकाणी एकूण ७ सेक्टर आहेत त्यापैकी ५ सेक्टरमध्ये श्रीसदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेक्टर १ मध्ये ४ ते ५ लाख लोकसंख्येसाठी ८ वैद्यकीय केंद्रे, सेक्टर २ मध्ये ८ लाख लोकसंख्येसाठी १२ वैद्यकीय केंद्रे, सेक्टर ३ मध्ये ३ लाख लोकसंख्येसाठी ४ वैद्यकीय केंद्रे, सेक्टर ६ मध्ये ३ लाख लोकसंख्येसाठी ३ वैद्यकीय केंद्रे आणि सेक्टर ७ मध्ये ३ लाख लोकसंख्येसाठी ३ वैद्यकीय केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्टेजच्यामागे १ वैद्यकीय केंद्र तर मैदानाच्या शेजारी असलेल्या आमराईत १ वैद्यकीय केंद्र उभारण्यात आले आहे. प्रत्येक वैद्यकीय केंद्रासाठी ४ डॉक्टर, २ नर्स, २ औषध निर्माता, १० स्वयंसेवक अशा प्रकारे एकूण १२८ डॉक्टर, ६४ नर्स, ६४ औषध निर्माता, ३२० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सेक्टर ५ येथे १० तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. ३२ वैद्यकीय केंद्रांवर औषधांचे ३२ किट ठेवण्यात येणार आहेत. या प्रत्येक किट मध्ये आवश्यक अशा ८० प्रकारच्या औषधांचा साठा करुन त्यांचे संच करण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी एकूण ५९ रुग्णवाहिका असणार आहेत. त्यापैकी ३२ रुग्णवाहिका साध्या असून त्या ३२ वैद्यकीय केंद्रांवर तैनात ठेवण्यात येतील. २ रुग्णवाहिका पार्किंगच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. १४ रुग्णवाहिका कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी ७ अतिदक्षता वैद्यकीय केंद्राच्या ठिकाणी आणि ७ आमराईच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. ५ कार्डियाक रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आले आहेत.

Arvind Kejariwal: केंद्र सरकाकडून केजरीवालांच्या अटकेचा कट, आपचा आरोप

नवीमुंबई आणि पनवेल मधील एमजीएम, रिलायन्स, फोर्टिस, अपोलो सारख्या मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये १०० साध्या आणि १० आय.सी.यू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच साध्या रुग्णालयांमध्ये २५ टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानात उन्हाळ्याच्या झळांमुळे सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या जनतेला निर्लजलीकरण (डिहायड्रेशन) चा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुबलक पाणी आणि ओआरएसची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मुखपट्टी (मास्क) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आढावा बैठकीतील सूचनांची अंमलबजावणी झाली की नाही याचा पालकमंत्री उदय सामंत हे सकाळी व संध्याकाळी पुरस्कार सोहळयाच्या तयारीचा स्वत: आढावा घेत आहेत. कार्यक्रम भव्य व लक्षात राहण्यासारखा होण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले होते त्यानुसार काम सुरू आहे.

Tags

follow us