प्राजक्त तनपुरेविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार नाही; करण ससाणे अपक्ष, सचिन जगतापांचा यूटर्न !

MvA not give candidate against Prajakta Tanpure विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक अर्ज दाखल न झाल्याने तनपुरेंसाठी निवडणूक सोपी झाली. 

MvA Not Give Candidate Against Prajakta Tanpure

MvA Not Give Candidate Against Prajakta Tanpure

Mahavikas Aghadi not give candidate against Prajakta Tanpure Karan Sasane is independent, Sachin Jagtap’s U-turn : अहिल्यानगरमध्ये विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांचे आठ अर्ज दाखल झाले आहे. भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी अर्ज दाखल केला नाही. तर खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील अर्ज दाखल केला नाही. यामुळे तनपुरे यांच्यासाठी ही निवडणूक आता सोपी झाली आहे.

तनपुरेंसाठी महायुती एकवटली मात्र आमदार जगतापांची अनुपस्थिती… नाराजीच्या चर्चांना उधाण

अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. निर्देशनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांनी भाजपकडून तर चार उमेदवारांनी एकूण आठ अर्ज दाखल केले आहे.महाविकास आघाडी कडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. विशेष म्हणजे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या अर्ज दाखल करणार अशी माहिती त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी यांनी दिली होती. मात्र लंके यांनी अर्ज दाखल केलाच नाही.

आवाज उठवण्याची वेळ आली आहे… केंद्र सरकारला धारेवर धरत अभिजीत दिपके यांची आंदोलनाची घोषणा

दुसरीकडे ससाणे हे काँग्रेसचे असून, त्यांना काँग्रेसने एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा पुरता गोंधळ दिसून आला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी उमेदवारी करण्याची तयारी केली होती. त्यांचे समर्थकाने थेट तसे जाहीर केले होते. परंतु शेवटपर्यंत त्यांनीही उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यामुळे त्यांनाही यूटर्न घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी ही निवडणूक ही सोपी झाली आहे.

चार अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले…

करण ससाने अपक्ष
कमलेश हस्तीमल गांधी अपक्ष
मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ अपक्ष
प्राजक्त प्रसाद तनपुरे भाजप
दत्तात्रेय भाऊसाहेब पानसरे अपक्ष

Exit mobile version