मोठी बातमी! अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक सुजय विखेंसह 8 उमेदवार बिनविरोध

Ahilyanagar District Bank Election : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत आठ उमेदवार बिनविरोध झाले आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Ahilyanagar District Bank Election

Ahilyanagar District Bank Election : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत आठ उमेदवार बिनविरोध झाले असून यात शेवगाव सोसायटी मतदारसंघातून राजश्री घुले, पाथर्डी सोसायटी मतदार संघातून आमदार मोनिका राजळे, राहाता सोसायटी मतदारसंघातून भाजप नेते आणि अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) , कोपरगाव सोसायटी मतदारसंघातून विवेक कोल्हे, नेवासा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री आणि आमदार शंकरराव गडाख, संगमनेर सोसायटी मतदारसंघातून रणजितसिंह देशमुख, श्रीरामपूर सोसायटी मतदारसंघातून श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे आणि बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची कामधेनू मानल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची 20 ऑक्टोबर रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) , विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) , माजी खासदार सुजय विखेंसह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वांचे एकमत झाल्याची माहिती दिली होती. तर आज आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, आठ उमेदवार बिनविरोध झाले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांचे एकमत झाले आहे. काही समन्वयाच्या अभावामुळे आणि मतभेदांमुळे उमेदवारी अर्ज दाखल झाले. मात्र, आता सर्वांना विश्वासात घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या तालुक्यांमध्ये अडचणी आहेत, त्या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात समन्वय साधणार आहोत. विखे पाटील आणि थोरात यांनी यापूर्वीच या प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास केला असून, स्थानिक पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी (20 ऑक्टोबर) बोलताना माहिती दिली होती.

Jio IPO ने रचला इतिहास ; अवघ्या 100 मिनिटांत IPO पूर्ण सब्सक्राइब-

follow us