महाविकास आघाडी एकत्रच राहणार, अशोक चव्हाणांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत विषय सुरु असून आम्ही वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत आहोत. तसेच महाविकास आघाडी एकत्रच राहणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण ठणकावूनच सांगितलं आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यावर अशोक चव्हाण यांनी भाष्य केलंय. कार्यकारिणीत भाजपनंदेखील भाकरी फिरवली; काकडेंसह तापकीरांना बाहेरचा रस्ता अशोक चव्हाण म्हणाले, शरद […]

Ashok Chavan

Ashok Chavan

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत विषय सुरु असून आम्ही वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत आहोत. तसेच महाविकास आघाडी एकत्रच राहणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण ठणकावूनच सांगितलं आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यावर अशोक चव्हाण यांनी भाष्य केलंय.

कार्यकारिणीत भाजपनंदेखील भाकरी फिरवली; काकडेंसह तापकीरांना बाहेरचा रस्ता

अशोक चव्हाण म्हणाले, शरद पवारांची भूमिका आणि कार्यकर्ते नाराज हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे. सध्या आम्ही वेड अॅंड वॉचच्या भूमिकेत आहोत, राष्ट्रवादी, ठाकरे गट, आणि काँग्रेसची आघाडी कायम एकत्र राहणार असल्याचं अशोक चव्हाणांनी यावेळी ठामपणे सांगितलं आहे. यासोबतच आणखी काही दिवसांत सर्व काही स्पष्ट होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

KL Rahul Ruled out of IPL: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! केएल राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर?

अद्याप तरी महाविकास आघाडीमध्ये असं काही घडलेलं नाही की आम्हाला वेगळं व्हावं लागेल, आजही आम्ही एकत्र आहोत आणि आमच्यात एकवाक्यता आहे. छोट्या-मोठ्या गोष्टी वगळता आम्ही लगेच कोणतीही टोकाची भूमिका घेत नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये; नाना पटोलेंचा हल्लाबोल

तसेच काहीवेळा गोष्टी घडत असतात. याचा अर्थ असा होत नाही की महाविकास आघाडीत फूट पडलीय. संजय राऊत हे ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत, ते अनेकदा भाष्य करीत असतात, पण हा गंभीर विषय नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

आम्ही ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशा तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी समन्वय ठेऊन काम करीत असतो, लहानमोठे गैरसमज कायमच होत असतात. मात्र, तरीही आम्ही तिन्ही पक्ष एकत्रच असल्याचं चव्हाण यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Exit mobile version