संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Untitled Design   2023 05 03T115714.724

Nana patole on sanjay raut : राज्यात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. कारण शरद पवार यांनी काल आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. दरम्यान, शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावी, यासाठी मनधरणी सुरू आहे. शरद पवारांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होते आहे. पण, याच वेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे. राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये, अशा शब्दात पटोलेंनी राऊतांना सुनावलं.

पटोले यांनी राऊतांवर निशाणा साधतांना सांगितलं की, संजय राऊत हे काही आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. त्यामुळं त्यांनी कॉंग्रेसमध्ये चोमडेगिरी करू नये. आणि गांधी कुंटुबावर बोलणं म्हणजे, सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. ज्या कुटुंबाने बलिदान दिलं आहे, पंतप्रधानपद सोडलं आहे, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद दुसऱ्याला दिलं आहे, त्याच्यावर राऊतांकडून आक्षेप घेतले जातात. हे बरोबर नाही, असं पटोलेंनी सांगिलतं

Salman Khan: ‘…कोण आहे ती महिला? नेटकऱ्यांनी भाईजानला विचारला प्रश्न
पटोले म्हणाले, मल्लिकार्जून खर्गे हे अनेकदा आमदार, खासदार राहिले आहेत. खर्गेहे आमचे मोठे नेते आहेत. त्यांनी आपलं आयुष्य पक्षासाठी खर्च केलं. संघटनात्मक काम त्यांनी केलं. त्यामुळं खर्गेच्या कार्यक्षमेवर आक्षेप घेणं, आणि गांधींपरिवार ‘आरोप करणं, हे योग्य नाही. संजय राऊतांना चोमडेगिरी थांबवावी़. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनीही सांगितलं होत की, माझ्याविषयी माझ्या पक्षातील प्रवक्ते बोलतील, बाकीच्यांना मी वकीलपत्र दिलं नाही, याचा दाखल देत राऊतांवर पटोलेंवनी टोला लगावला.

राष्ट्रवादीच्या निवृत्त होण्याच्या घोषनेविषयी बोलण्यास पटोलेंनी नकार दिला. मात्र, शरद पवार हे पुरोगामी विचारांना मानणारे नेते आहे. शाहु-फुले विचारांचे ते समर्थक आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत जाईल असं वाटत नाही. अशी चुक शरद पवार करणार नाही. आणि राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तर आम्ही भाजपसोबत लढू, असं त्यांनी सांगितलं.

Tags

follow us