लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी असला तरी महाविकास आघाडीने मात्र लोकसभेसाठी कंबर कसली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर महाविकास आघाडीतील एकवाक्यता अजून वाढली आहे. त्यामुळे याच आधारावर लोकसभा निवडणुकांच्या चर्चेसाठी महाविकास आघाडीची बैठक झाली असून या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
यापूर्वी महाविकास आघाडीच्या काही बैठका झाल्या आहेत. या बैठकीमधून लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार लोकसभेच्या 48 जागांपैकी शिवसेनेला 21, राष्ट्रवादीला19 आणि काँग्रेसला 8 जागा दिल्या जाणार आहे. असं ठरलं आहे. याच बैठकांमध्ये कोणता पक्ष कोणती जागा लढवणार हे देखील फायनल झालं असल्याचं सांगण्यात येत आहे, फक्त काही जागावर अजून अंतिम निर्णय बाकी असल्याच सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी ‘ही’ दोन नाव सुचवली होती; भुजबळांचा गौप्यस्फोट
याच बैठकीमध्ये आपापल्या मित्रपक्षांना स्वतःच्या कोट्यातून जागा द्याव्यात असंही ठरलं आहे, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मित्रपक्षाला जागा हे तिन्ही पक्ष आपल्या कोट्यातून देतील. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला अजून महाविकास आघाडी म्हणून स्थान मिळालं नाही, त्यामुळे वंचितला शिवसेनेच्या कोट्यातून जागा दिल्या जातील. असं चित्र सध्या तरी दिसत आहे.
यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, तर काँग्रेसचा केवळ १ खासदार निवडून आला होता. याच निकालाचा आधार घेत जागावाटपाचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच फॉर्म्युलानुसार शिवसेनेला सर्वाधिक २१ जागा देण्याबाबत चर्चा झाली आहे तर त्या पाठोपाठ राष्ट्रवादीला १९ जागा दिल्या जातील.
याशिवाय सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबई आणि मुंबई उपनगरमध्ये लोकसभेच्या सहा आहेत. या सहा जागेपैकी शिवसेनेला चार जागा दिल्या जातील. तर बाकी दोन जागांपैकी एक काँग्रेसला, तर एक जागा राष्ट्रवादी लढवेल. अशीही चर्चा या बैठकीत झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.