तनपुरेंसाठी महायुती एकवटली मात्र आमदार जगतापांची अनुपस्थिती… नाराजीच्या चर्चांना उधाण

Prajakt Tanpure MLA Jagtap तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार जगताप अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Prajakt Tanpure MLA Jagtap

Prajakt Tanpure MLA Jagtap

Mahayuti unites for Praj Tanpure, but MLA Jagtap’s absence sparks discontent : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन जगताप हे इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर अजित पवार गटामध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

त्यांच्याच पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांच्या विधानाकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. त्यांनी आधी स्वतःच्या पक्षालाच श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली आहे असा जहरी टोला विखे पाटील यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की नगर शहरातील राजकीय मी स्वतः आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली आहे. ते कुठलीही वेगळी भूमिका घेणार नाहीत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.

भाजपचं ‘निष्ठावंतांनो अजून वाट पहा’ हे सूत्र कायम; मराठवाड्यात सर्व आयात उमेदवार, जातीय समिकरणावर जोर

कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. इतर कोणतेही आरक्षण काढून मराठा समाजाला देण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे कोणत्याही समाजाने गैरसमज करून घेऊ नये स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे महायुतीच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी अजित पवार गटाच्या अनुपस्थितीमुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

भाजपाने दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं करेन

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानत प्रतिक्रिया दिली. भाजपाने मला मोठी संधी दिली आहे. या संधीचं नक्कीच सोनं करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट करत राहुरी पोटनिवडणुकीदरम्यान चर्चा झाली होती, त्यानंतर कोणताही संपर्क किंवा चर्चा झालेली नाही असेही त्यांनी सांगितले.

 

 

Exit mobile version