Accident at Mela Bus Stand : नाशिक जिल्ह्यातील मेळा बसस्थानकात दुर्दैवी घटना घडली आहे. येथे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने तीनजण चिरडले गेले आहेत. यात एकाचा दु:खद मृत्यू झाला आहे. (Accident) या अपघातात इतर दोघं गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, पुढील 2 ते 3 दिवस कडाक्याची थंडी, IMD ने दिला इशारा, नाशिकला यलो अलर्ट
नेमकं काय घडलं?
नाशिकच्या मेळा बसस्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला एक चौकशी कक्ष आहे. याच चौकशी कक्षाच्या आजूबाजूला बस येऊन उभ्या राहतात. येथे 6 डिसेंबरच्या रात्री ठरलेल्या वेळेत एक बस बसस्थानकात येऊन थांबत होती. मात्र, याचवेळी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट चौकशी कक्षाला जाऊन धडकली. या दुर्घटनेत बसने एकूण तिघांना चिरडलं. यातील एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
बसचालक पोलिसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस ही एक महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बस होती. हा अपघात होताच प्रवासी आक्रमक झाले. बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मात्र, प्रवासासाठी निघालेल्या एक प्रवाशाला थेट मृत्यूला सामोरं जावं लागल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.