Major recruitment in High Court and Benches; Big decisions taken in Cabinet meeting : राज्याच्या मंत्रिमंडळाची दर मंगळवारी पार पडणारी बैठक आज मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी पार पडली. यामध्ये उच्च न्यायालयासह खंडपीठांमध्ये मोठी भरती, तसेच शिक्षण संस्था, वसतीगृहांसाठी 500 कोटींची तरतूद असे मोठे निर्णय घेण्यात आले. जाणून घ्या सविस्तर…
उद्योग विभाग-
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर. धोरण कालावधीत 50 हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय.
मोठी बातमी! क्रॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची जामीनावर सुटका
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जिर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. पाच वर्षांसाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद.
चंदू चॅम्पियन टीमकडून कार्तिक आर्यनच्या पहिल्या-वहिल्या फिल्मफेअर अॅवार्डचं सेलीब्रेशन, पाहा फोटो
विधि व न्याय विभाग-
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते ड संवर्गात 2 हजार 228 पदांची निर्मिती. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता.