राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आवश्यक आहे. कोणी नाराज होऊ नये म्हणून जर मंत्रिमंडळाचा विस्तार सरकाने थांबवला असेल तर हे चुकीचं आहे. यावेळी आमदार आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत म्हंटले की जर एखाद्या मंत्र्याकडे आठ-आठ खाती आणि आठ-आठ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असेल तर हे चुकीचं आहे. आज ते अमरावतीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
शिंदे – फडणवीस सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. एका जिल्ह्याला एक पालकमंत्री द्यावा आम्हालाच मंत्री करावं असं आम्ही म्हणत नाही. परंतु सरकारने लवकर निर्णय घेतला पाहिजे कारण सामान्य जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. सरकार जर जनतेसाठी असत तर सरकारने मंत्रिमंडळाबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे. असे बच्चू कडू म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला आणि अमहमदनगर येथे दोन गटात हिंसाचार घडला आहे. या दंगलीमध्ये काहीजणांचा जीवही गेला आहे. अलीकडेच अकोला येथे झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पोलिसांसह अन्य आठ लोकही जखमी झाले आहेत.
https://letsupp.com/pune/social-media-star-babaraje-deshmukh-of-maval-taluka-arrested-for-demanding-extortion-of-%e2%82%b970-lakh-48328.html
अकोला दंगलप्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर अरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावरुन आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. दंगल घडवण्यासाठी जे पुढं आले असतील त्यांचे हात छाटले पाहिजे असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडलेल्या दंगलीप्रकरणी विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, दंगल करणारा कुणीही असो.. मग तो हिंदू असो वा मुस्लीम असो किंवा इतर कुठल्याही जातीचा असो.. जे जे दंगल पेटवण्यासाठी पुढं आले असतील, त्याचे हात छाटले पाहिजे. दंगलीच्या माध्यमातून शहरात अशांतता निर्माण करुन विकासाला बाधा आणण्याचा काम केलं जातं आहे.