Download App

मंदिरात जा अन् माफी मागा; मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात नितेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

Nitesh Rane On Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने (NIA Court) मोठा निर्णय देत साध्वी प्रज्ञासिंह

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane On Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने (NIA Court) मोठा निर्णय देत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसने हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. नितेश राणे आज माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. आम्ही दुसऱ्याचा धर्म संपवून स्वत:चा धर्म वाढावा असं कधीही करत नाही. काहींचे आज तोंड काळं झालं असेल असं माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले. तसेच ज्या लोकांनी समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना तोंडावर चपराक मिळाली आहे. यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. या निकालानंतर एकच विषय सिद्ध होते की, आतंकवादाचा रंग आणि जिहादाचा रंग हा हिरवात आहे. काँग्रेसच्या काळात हिंदुत्वादी कार्यकर्त्यांवर खोट्या केस करण्यात आल्या, त्यांना अडकवण्यात आले असा दावा देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला. मात्र आता हे शक्य नाही. हिंदुत्वादी विचारसणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना हे शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षेत आहे ते पुन्हा सिद्ध झाला आहे. असं देखील नितेश राणे म्हणाले.

‘भगव्या’चा अपमान करणाऱ्यांना देव शिक्षा करेल… मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञा कडाडल्या

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, या लोकांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे. यांनी मंदिरात जाऊन हिंदू समाजाची माफी मागावी. पुरावे यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. न्यायालयात ते कोणतेही पुरावे सिद्ध करु शकले नाही असेही या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले.

follow us