Download App

शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरोधात कारवाई करण्यासाठी कायदा करणार ; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

  • Written By: Last Updated:

Manikrao Kokate Statement Make Law For Farmers To Prevent Cheating : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होवून खातेवाटप पार पडलंय. यावेळी कृषीमंत्रिपद माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलंय. दरम्यान नाशिकमध्ये बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय. शेतकऱ्यांच्या फसवणूक रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. असं स्पष्ट करत कोकाटे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात (Farmers) कायदा करणार असल्याची देखील घोषणा केलीय.

प्रत्येकाला आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार, PM मोदींच्या हस्ते होणार स्वामित्व योजनेचा शुभारंभ, बावनकुळेंची माहिती…

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद (Law For Farmers) असेल, असं स्पष्ट केलंय. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर कोणत्या कोणत्या कायद्यान्वये कारवाई करायची, अशी अडचण असते. त्यामुळे नवा कायदा आवश्यक आहे, असं देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हटले की, अनेकदा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते. परंतु जोपर्यंत कायदा करत नाही, तोपर्यंत त्या व्यापाऱ्यांच्या नावाची यादी करता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत कायदा तयार होत नाही. तोवर शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री कोणत्या व्यापाऱ्यांना करावी, या संदर्भात यादी करता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कारवाई कशी करायची, याचा निर्णय पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी घ्यावा अशा सूचना देखील माणिकराव कोकाटे यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर कायदा करण्यासंदर्भात पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करणार आहे, असं देखील माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलंय.

… तर मी बीड जिल्ह्याचे पालकत्व घेईन, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

माणिकराव कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संशयीत आरोपींची देखील पोलिसांनी सखोल चौकशी करावी, असं आवाहन त्यांनी केलंय. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी मोहीम राबविण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांची फसवणुकीपोटी झालेल्या 46 कोटी रूपयांच्या वसुलीसाठी सर्व सहकार्य केलं जाईल. यामध्ये आरोपी असलेल्या व्यापाऱ्यांच्या मालमत्ता सील कराव्या, असं देखील कोकाटे म्हणाले आहेत. शेतकऱ्यांनी फसवणूक प्रकरणी पोलीस अधीक्षक यांची भेट घ्यावी, असं विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे म्हणाले आहेत.

शेतमाल देताना शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून सौदा पावती करून घ्यावी. फसवणूक झाली तर कायदेशीर कारवाई केली जाईल. व्यापाऱ्यांची पार्श्वभूमी समजावून घ्यावी, असं देखील माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत. यासंदर्भात कृषी विभाग, द्राक्ष बागायतदार आणि पोलिसांतर्फे जनजागृती केली जाईल, असं देखील कोकाटेंनी स्पष्ट केलंय.

 

follow us