Manikrao Kokate : गेली अनेक दिवसांपासून ज्यांचं मंत्रिपद जाईल अशी चर्चा होती त्यांचं (Kokate) आता खात गेलं आहे असे राज्यात सध्या चर्चेत असलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपलं कृषीमंत्रीपद काढून घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्रिपदावरुन हटवून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जो निर्णय घेतला आहे, तो मला मान्य आहे, असं माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत. त्याचबरोबर दत्तात्रय भरणेंना काही मदत लागली मी नक्की करेन आणि त्यांची मला मदत लागल्यास मी घेईन, असंही कोकाटे म्हणालेत.
नवीन खातं आवडलं का?, असं विचारताच I AM VERY HAPPY, असं माणिकराव कोकाटे म्हणाले असून ते खरच खूश आहेत की नाराज आहेत अशा चर्चा आता रंगल्या आहेत. दरम्यान, क्रीडा आणि युवक खातं मिळाल्याने अजितदादांचे विश्वासू असलेलेल दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती. दत्तात्रय भरणेंनी खातेवाटपानंतर ही नाराजी उघडही केली होती. मात्र, आता कोकाटेंवरील कारवाई ही दत्तात्रय भरणेंसाठी एक लॉटरी ठरलीय असं बोललं जातय.