नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातील तिसरी कारवाई, सीबीआयच्या कारवाईत मनीषा हवालदारला अटक

मनीषा हवालदार भौतिकशास्त्राची तज्ञ प्राध्यापक होती. अनेक वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये पेपर सेट करण्याचे काम करत होती.

Untitled Design 72 1

Untitled Design 72 1

Manisha Havaldar arrested in CBI action : नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातून तीसरी अटक झाली आहे. मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे यांच्यानंतर आता प्राध्यापिका मनीषा हवालदार यांना अटक करण्यात आली आहे. मनीषा हवालदार ही सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशाला येथे कार्यरत आहे. ती भौतिकशास्त्राची तज्ञ प्राध्यापक होती. अनेक वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये पेपर सेट करण्याचे काम करत होती.

 

नीट पेपर फुटी प्रकरणानंतर सीबीआयने आता पर्यंत नागपूर, नाशिक , लातूर ,अहिल्यानगर आणि पुणे येथे मोठ्या कारवाया केल्या. पुण्यातून मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे मनीषा वाघमारे हिला सुद्धा सीबीआयने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता सीबीआयने पुढील तपासामध्ये मनीषा हवालदार हिला ताब्यात घेतले आहे. पुण्यातून नीट पेपर फुटी प्रकरणात सर्वाधिक आरोपी ताब्यात घेतले जात असल्याचे दिसून येत आहे.

15 ऑगस्टपर्यंत मराठी शिका, अन्यथा परवाना धोक्यात; रिक्षा-टॅक्सी चालकांना सरकारचा इशारा

नीट पेपर फुटी प्रकरणात यापूर्वी मनीषा मांढरे व मनीषा वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिसरी व्यक्ती अटक झाली तिचेही नाव मनीषाच आहे. त्यामुळे सर्व मनीषा नीट पेपर फुटी प्रकरणात एकत्र आल्याचे बोलले जात आहे. पुण्यातून आणखी किती जणांना अटक होणार ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे.

Exit mobile version