Manoj Jarange On Ramdas Kadam : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या आरोपावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना जोरदार टीका करत मनोज जरांगे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत तुझी गाठ आमच्याशी आहे असा इशारा दिला आहे. तर आता या टीकेवर मनोज जरांगेंनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर देत रामदास कदमांना थोरली बेगम म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले की, श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मला 500 कोटी रुपये दिले का? ही गोष्ट खरी आहे का? याबद्दल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्टीकर द्यावे. मी श्रीकांत शिंदे यांच्याकडून 500 कोटी घेतले का? या प्रश्नाचे हो किंवा नाही इतकेच उत्तर द्यावे. तुम्ही मला 500 कोटी रुपये दिले का? याचा उत्तर शिंदेंनी द्यावं कारण त्यांनीच भाजपाला (BJP) सांगितले की, मी मनोज जरांगे यांना 500 कोटी दिले कारण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना तसे सांगण्याइतकी श्रीकांत शिंदे यांची उंची नाही. त्यामुळे ही गोष्ट एकनाथ शिंदे यांनीच भाजपाला सांगितली असावी ही गोष्ट खरी आहे की नाही एवढेच एकनाथ शिंदे यांनी सांगावे असं मनोज जरांगे म्हणाले.
तर दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर टीका करत मनोज जरांगे म्हणाले की, मी तुमच्याकडे साध्या प्रश्नाचे उत्तर मागितले आहे. तुम्ही चिडत आहात. बावचून गेला आहात. हो किंवा नाही असे उत्तर द्या. भाजप तुम्हाला संपवत आहे की, तुम्ही मला संपवत आहात या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. थोरल्या बेगमला हे कळले पाहिजे. थोरली बेगम काल बोलली ना? रामदास कदम म्हणतात माझ्या संपत्तीची चौकशी करा. त्यांनी पक्षासाठी खूप काही केले आहे. खस्ता खाल्ल्या आहेत हे मी ऐकून आहे. तुम्ही उगाच चिडचिड करु नका. थोरल्या बेगमला शेवटी चोमडेपणा करावा लागला पण तुम्ही चिडचिड करण्यापेक्षा मी काय बोललो हे समजून घ्या असं मनोज जरांगे म्हणाले.
जिल्हा बँक बिनविरोधला ब्रेक? राम शिंदेंकडून कर्जत- जामखेड मधील उमेदवारांची यादी जाहीर
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मला औकात आहे का, मला स्वाभिमान आहे की नाही, याबद्दल बोलण्यापेक्षा मराठ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलावे. एकनाथ शिंदे यांच्याविषयी नसता तर मराठ्यांनी त्यांना एवढ्या उंचीवर नेले नसते. मला श्रीकांत शिंदे यांनी 500 कोटी रुपये दिले का? याचे उत्तर द्या. मी वाट बघतोय एकनाथ शिंदे काय बोलतात? असं मनोज जरांगे म्हणाले.
