Download App

फडणवीस कावेबाज माणूस, त्यांना औरंगजेबाची कबर काढायचीच नाही फक्त फोकसला आणली; जरांगेंचं टीकास्त्र

Manoj Jarange यांनी मराठा बांधवांसोबत बैठक पार पाडली. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

Manoj Jarange Creticize Devendra Fadanvis while Maratha Meeting : गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले आंदोलन मनोज जरांगे यांनी आज अनेक तालुक्यांमध्ये मराठा बांधवांसोबत पहिल्या टप्प्यातील बैठक पार पाडली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

चॅटजीपीटीचा गजब दावा! वडिलांनाच म्हटलं स्वतःच्या मुलांचा खुनी, 21 वर्षांची शिक्षाही…OpenAI विरोधात खटला

जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हा कावेबाज माणूस आहे. सरकारलाच औरंगजेबाची कबर हटवायची नाहीये. सरकारला कबर हटवायची असती तर त्यांनी तिथे पोलिसांचं संरक्षण दिलंच नसतं. असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी हा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर काढायचीच नाही. त्यांनीच कबर फोकसला आणली. ते डबडं कुठं पुरून ठेवलंय हे कुणालाच माहीत नव्हतं. त्यांनी उलट माहिती करून दिली. औरंगजेबला फोकसमध्ये आणलं. फडणवीस यांना कबर काढायचीच नाही. काढायची असती तर त्यांनी पोलीस संरक्षण नसतं लावलं. त्यांना फायद्यासाठी लढायचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

नागपुरात हिंसाचारवर; फडणवीसांनी दिले थेट आदेश!

औरंगजेबाची खबर काढून टाका यावरून नागपुरमध्ये आंदोलन झाली अन् पुढे दंगलही झाली. त्यानंतर महाराष्ट्र एक वातावरण निर्माण झालं. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Fadnavis ) यांच्यावरही जोरदार टीका झाली. दरम्यान आज फडणवीस यावर सविस्तर बोलले आहेत. नागपूरमधील हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केलं जाणार आहे. झालेल्या नुकसानाची किंमत काढली जाणार आणि ती वसून करणार. जर दंगेखोरांनी त्याचे पैसे भरले नाहीत तर, त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल असा थेट इशारा मुंख्यमंत्री अन् गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

follow us