Download App

Manoj Jarange : शिंदेंची फेब्रुवारीची मुदत मान्य नाही; मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं…

Manoj Jarange On Cm Eknath Shinde : राज्यात (Maharashtra)मराठा समाज कुणबी असल्याच्या 1967 पूर्वीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही कुणबी आरक्षणाचा (Maratha Reservation)लाभ देणार आहात पण तो कशाच्या आधारावर देणार आहेत? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नसल्याचे सांगितले. फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची फेब्रुवारीची मुदत मान्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

Eknath Khadase : …तोपर्यंत अजित पवार संघाला समर्थन देणार नाही; खडसेंचा अजितदादांवर ठाम विश्वास

त्यासाठी सरकारकडून कसे निकष लावले जाणार आहेत. त्यासाठी 24 डिसेंबरला कायदा पारित करणार आहेत का? त्याचंही उत्तर देणं अपेक्षित असल्याचं यावेळी मनोज जरांगे म्हणाले. नोंदी सापडल्या आहेत.

त्यानंतर आता नातेवाईकांना आरक्षणाचा फायदा देण्यासाठी काय अटी असणार आहेत? की अट नसणार हे उत्तर देखील देणं गरजेचं आहे. मग कायदा पारित करण्याची गरज पडणार नाही. किंवा नातेवाईकांना निकष, अटी लावून द्यायचं असेल तर त्यासाठी सरकारला कायदाच पारित करावा लागेल अन् तो सरकारने 24 डिसेंबरच्या आत करावा असा थेट इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Tags

follow us