Download App

खरी मजा आत्ताच…हिशोब चुकता करण्याची; मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर वार

काही लोक म्हणतात की आता पहिलं सरकार आहे, आरक्षण देतील का?, पण आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची. होऊ द्या आता.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil :  सध्या सुमारे 2 कोटी पेक्षा जास्त मराठे आता आरक्षणात गेलेत. 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. मी राहू न राहू याची परवा नाही, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत. (Manoj Jarange Patil ) ते परभणीत बोलत होते. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाहीत हे बघतोच असं विधानही त्यांनी केलं आहे.

Video : ठरलं तर! मनोज जरांगेंचं २५ जानेवारीपासून पुन्हा उपोषण; सरकारला निर्वाणीचा इशारा

काही लोक म्हणतात की आता पहिलं सरकार आहे, आरक्षण देतील का?, पण आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची. होऊ द्या आता. पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते, असं विधान करत मनोज जरांगेंनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

मनोज जरांगे हे कालपासुन परभणीत आहेत. काल रात्री परभणीच्या दामपुरी गावात ते मुक्कामी होते. त्या ठिकाणी झालेल्या गाव भेट दौऱ्या दरम्यान गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ज्यामध्ये ज्यात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. तसंच, 25 जानेवारीपासून उपोषण सुरू करणार, मी राहू न राहू पण आरक्षणासाठी लढा देणार आहे असंही ते म्हणाले.

मस्साजोगला जाणार

मनोज जरांगे आज परभणी आणि मस्साजोगला जाणार आहेत. मनोज जरांगे परभणीत सूर्यवंशी कुटुंबीयांची तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांचीही सांत्वनपर भेट घेणार आहेत. 28 तारखेला बीड जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मोर्चा ठेवलेला आहे. त्यातसुद्धा बीड जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे. तसंच कोणाचा पण बाप येऊ द्या ते मॅटर मी दबू देत नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

लग्नाची तारीख धरू नये

25 जानेवारी 2025 पासून आम्ही अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. 25 जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी फडणवीस सरकारला दिलाय. तर 25 जानेवारी रोजी राज्यभरातील मराठ्यांनी अंतरवलीकडे यायचं. मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा. सर्वांनी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे असंही ते म्हणाले आहेत.

follow us