मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Munde) हे दोघे मागील काही दिवसांपासून एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. धनंजय मुंडे यांनी मला जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप जरांगे यांनी केला. परंतु, त्याची काही चौकशी होत नसल्याने जरांगे पाटील आता सरकारवर भडकले आहेत.
धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळत थेट सीबीआय चाैकशीची मागणी केली. फक्त हेच नाही तर माझी आणि जरांगे दोघांचीही नार्को टेस्ट करा, असही धनंजय मुंडेंनी म्हटल. जरांगे यांनीही नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं म्हटलं. आता पुन्हा एका मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोप केली आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, हा खूप मोठा विषय आहे.
धनंजय मुंडेने अजित पवारांकड जात म्हटलं की, या चौकशीपासून मला टाळा. मला या चौकशीपासून दूर ठेवा, मला साथ द्या. नसता माझ्या लोकांना मराठ्याचे लोक मारतील. मी जर चाौकशीला गेलो तर शंका येईल. जर तो इतका मोठा कट घडून आणत असेल आणि अजित पवार आणि फडणवीस त्याला क्लीनचिट देत असतील तर मग ही अवघड गोष्ट आहे. तसंच, आम्ही देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्यापैकी एक होतो. पण असे होणार असेल तर तो घातपात घडून आणणार असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस त्याला क्लीनचिट देणार.. तो म्हणतो या चाैकशीपासून मला टाळा.. मला दूर ठेवा…अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्याला साथ देणार असतील तर ही खूप जास्त वाईट गोष्ट आहे, असे नालायक सरकार मी आतापर्यंत कधीच बघितले नाही. जे सत्याचे सत्य करत नाहीये.
सत्याच्या बाजूने उभा राहत नाहीये. फक्त भाषणातून बोलणार. सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरील विश्वास उडाला आहे. आम्हाला ही माहिती मिळाली, जर हे खरे असेल तर किती अवघड काम आहे. तो चार पाच दिवसापूर्वी गेला असेल आम्हाला काल रात्री उशीरा ही माहिती मिळाली. एका निच माणसाला धनंजय मुंडेला तुम्ही वाचवणार असाल तर ही सोप्पी गोष्ट नाहीये, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
