Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 14 दिवस; उद्या घेणार मोठा निर्णय

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत 29 ऑगस्टपासून उपोषणाची

Manoj Jarange

Manoj Jarange

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत 29 ऑगस्टपासून उपोषणाची सुरुवात केली आहे. आज या उपोषणाचा चौदावा दिवस असून जेव्हापर्यंत सर्व मांगण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्याकडून घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याने त्यांच्यावरती उपचार करण्यात आले आहे. माहितीनुसार, रात्री उशिरा त्यांना सलाईन लावण्यात आली होती. तसेच वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी देखील करण्यात आली आहे.

चार दिवसापासून सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा नाही

तर गेल्या चार दिवसापासून सरकारच्या शिष्टमंडळाची कुठलीही चर्चा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासबोत न झाल्याने आता पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे उद्या (12 सप्टेंबर) रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला अंतरवाली सराटीत पोहचण्याचे आवाहन केले आहे. उद्या पाटील मराठा आंदोलनासंदर्भात काही मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. मुंबईत आंदोलनासंदर्भात मनोज जरांगे पाटील उद्या मोठा निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गेल्या चार दिवसापासून सरकारच्या शिष्टमंडळाची कुठलीही चर्चा नाही. उद्या मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत 12 वाजता राज्यव्यापी निर्णायक बैठक होणार आहे. अंतरवाली सराटीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला धडक देऊ असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला होता त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोल्हापूर, धाराशिव, नांदेडसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज धो धो पावसाची शक्यता ; अलर्ट जारी –

Exit mobile version