ताईने सांगितलंय ना, मग… अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis

Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषणाची सुरुवात केली आहे. या उपोषणाचा आजचा 12 वा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जेव्हापर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही तेव्हापर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका जरांगे पाटलांकडून घेण्यात आली आह. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना घरी जेवायला निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता अमृता फडणवीसांच्या या निमंत्रणावर जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

आज अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  म्हणाले की, ताईने (Amruta Fadnavis) सांगितलंय ना मग जेवायला पण जाऊ पण भाऊ मैदानात असताना, आंदोलन करत असताना बहिणीने जेवण्यासाठी भाऊला बोलवू नये. शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये. बहिणीने याबाबत बारकाईने विचार करावा. मी भाऊबीजेल जेवायला येईन. बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं, साडीचोळी घेऊन जाऊ असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तर यावेळी मी मुंबईला (Mumbai) जाणारे हे निश्चित आहे. 12 तारखेला एकत्र आलो की, तारीखच जाहीर करु असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. जसे दिवस येतील तसा संघर्ष करावा लागतो. कुणबी प्रमाणपत्रांची शिबीरं कशी राबवतात बघू या? आंदोलन सुरु आहे म्हणून शिबीरं घेतायत का तेही बघू. मार्गदर्शक सांगतील तसं सरकारचं शिष्टमंडळ वागतं. शिष्टमंडळ येण्याची मी वाट बघत नाही. मी मुंबईला येणार हे निश्चित आहे. 12 तारखेला एकत्र आलो की तारीखच जाहीर करु असं देखील माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सॉफ्टमेट कंपनीचा मालक मंदार पाथरीकर याला पुणे विमानतळावर अटक; सायबर पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर येथील एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटली यांच्याबाबत अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत, त्यांना मी घरी जेवायला यायचे निमंत्रण देते असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

follow us