Manoj Jarange : मोदींचं नाव घेत जरांगेंचं आंदोलन नव्या वळणावर; कंडका कधी पडणार सांगितलं…

Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर, सरकार उलथवून टाकण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. तसेच आंदोलनाचे एकूण सात टप्पे असतील असे सांगत आरक्षणाचा कंडका कोणत्या टप्प्यात पडणार यावर तसेच राज्य सरकार मी नाही तर, मोदी आणि शाहचं उलथवून टाकतील असे जरांगेंनी म्हटले आहे. […]

मोदींचं नाव घेत जरांगेंनी आंदोलनाला दिला नवा टर्न; आरक्षणाचा कंडका कोणत्या टप्प्यात पडणार सांगितलं

मोदींचं नाव घेत जरांगेंनी आंदोलनाला दिला नवा टर्न; आरक्षणाचा कंडका कोणत्या टप्प्यात पडणार सांगितलं

Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर, सरकार उलथवून टाकण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. तसेच आंदोलनाचे एकूण सात टप्पे असतील असे सांगत आरक्षणाचा कंडका कोणत्या टप्प्यात पडणार यावर तसेच राज्य सरकार मी नाही तर, मोदी आणि शाहचं उलथवून टाकतील असे जरांगेंनी म्हटले आहे. जुन्नरमधून मुंबईकडे रवाना होताना टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगेंनी वरील भूमिका स्पष्ट केली आहे.

Manoj Jarange : जरांगेंची मोठी खेळी, फडणवीस सरकारला ‘चेकमेट’ करण्याचा डाव टाकला!

सरकार कसं उलथवून टाकणार?

आरक्षण मिळालं नाही तर, सरकार कसं उलथवून टाकणार? असे जरांगेंना विचारले असता ते म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून मोदी आणि शाह साहेबांना एवढा डाग लागत असेल तर, ते बरोबर सरकार उलथवून लावतील असे जरांगेंनी सांगितलं.

आंदोलनाचा कंडका केव्हा पडणार?

जरांगेंनी आरक्षणासाठी आंदोलनाचे सात टप्पे असताली असे सांगितले आहे. त्यावर आंदोलनाचा कंडाका कधी पडणार आणि आरक्षणाचा करेक्ट कार्यक्रम होणार असे विचारले असता जरांगे म्हणाले की, आणखीनही फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातातून संधी गेलेली नसून, त्यांनी गोरगरिबांच्या लेकरांना न्याय देण्याचे काम कारावे. आम्हाला जेलमध्ये टाकण्याच्या आणि गोळ्या घालण्याचा भानगडीत राहू नका असेही जरांगेंनी यावेळी स्पष्ट केले.

मनोज जरांगेंना पहिला मोठा धक्का! शिंदे समितीनेच केली मागणीची पोलखोल, आरक्षणासाठी गॅझेटची युक्ती फसली?

… तर सर्व मराठा नेते मैदानात दिसतील

आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असून, प्रत्येकाने कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करावे या फडणवीसांच्या विधानावर आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनचं आंदोलन करणार आहोत. मात्र, अंतिम टप्प्यात आलेल्या आमच्यावर खूप अन्याय होत आहे असे वाटले तर, एवढेच सांगतो की, एकाही पक्षातला मराठा पक्षात न दिसता मराठ्यांच्या लढाईच्या मैदानात उतरलेला दिसेल. मराठा नेत्यांना आवाहन केले किंवा त्यांच्या काही चर्चा झाली का? यावर उत्तर देताना जरांगे म्हणाले की, मला कुणाशीही बोलण्याची गरज नसून, शेवट टप्पा ज्या दिवशी वाटेल आणि आमच्यावर खूप अन्याय होत आहे असे वाटेल त्यावेळी पक्ष ठिकूरलेला दिसेल असे सांगत जातीच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी एका बाजूने सर्व पक्षातले सत्ताधाऱ्यांसहीत एका ताकतीने एका बाजूला होतील असे जरांगे म्हणाले.

Exit mobile version