Ajay Baraskar On Manoj Jarange : मनोज जरांगे आता टेंडर योद्धा; अजय बारस्कर भडकले

Ajay Baraskar On Manoj Jarange : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा अभ्यासक

Ajay Baraskar On Manoj Jarange

Ajay Baraskar On Manoj Jarange

Ajay Baraskar On Manoj Jarange : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा अभ्यासक अयज बारस्कर यांनी अनेक गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे आता संघर्ष योद्धा राहिलेला नाही तर तो आता टेंडर योद्धा बनला आहे अशी टीका अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या घरातील लोक वाळूचोर आहेत. त्यांच्या बायकोचा भाऊ विलास खेडकर हा वाळूचोर आहे. जरांगे एक टोळी तयार करुन कंत्राटे घेण्याचा उद्योग सुरु केला आहे. किशोर बलांडे हा त्याचा पार्टनर आहे. मनोज जरांगे आता संघर्ष योद्धा राहिलेला नाही तर तो आता टेंडर योद्धा बनला आहे.

पुढे बोलताना बारस्कर म्हणाले की, संजय कटारे (Sanjay Katare) म्हणजे मनोज जरांगेचा अदृश्य हात आहे. संजय कटारे देखील वाळूचोर आहे. त्याने मार्च 2023 मध्ये 4 कोटीहून जास्त रुपयांची वाळू चोरी केली आणि याचे आमच्याकडे पुरावे आहे. हा ब्लॅकलिस्टमध्ये  असलेला कंत्राटदार आयटीआय पास झालेला आहे.  त्याला 14 कोटी रुपयांचे कामं मिळतात. त्याने प्रोझोन क्रीम एरियात कुठून प्लॉट घेतला? असं देखील बारस्कर म्हणाले.

तर या पत्रकार परिषदेत बोलताना बारस्कर (Ajay Baraskar) यांनी विखे पाटील (Vikhe Patil) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. विखे पाटील यांच्या माध्यमातून माणिक इन्फ्रास्टक्चरकडे 635 कोटी रुपयांचे काम देण्यात आले. अनेक निविदा आलेल्या. कमी पैशात काम करणाऱ्या कंपन्यांना नकार दिला.

नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांचा हल्लाबोल-

माणिक इन्फ्रास्टक्चरला तीन वर्षात कोट्यवधींची कामे देण्यात आली. या सिंडिकेट टोळीने 3770 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. हे सगळे गुन्हेगार आहेत. अधिकारी प्रशासन हतबत झाले आहे असं देखील या पत्रकार परिषदेत बोलताना अजय बारस्कर म्हणाले.

Exit mobile version